सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी मंगळवारी प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार निर्मला जंगम, भारतसिंग बडूरवाले, जुगनबाई आंबेवाले, रवी कय्यावाले, यांच्या प्रचारार्थ भव्य शक्तीप्रदर्शन विजय संकल्प रॅली काढण्यात आली.
यावेळी लाडक्या बहिणींनी भाजप उमेदवारांचे पुष्पहार घालून तसेच ओवाळणी करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या विजय संकल्प रॅलीने संपूर्ण प्रभाग भाजपमय झाला होता. विशेषतः लाडक्या बहिणींचा मोठ्या संख्येने सहभाग हे या रॅलीचे आकर्षण ठरले.
विकास हाच आमचा अजेंडा या घोषणेसह भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उतरले असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे उमेदवारांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, प्रभाग १७ मधील चारही भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या भव्य पदयात्रातून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ही पदयात्रा लष्कर, जगदंबा चौक, बेडर पूल, नळ बाजार चौक, सत्यनाम चौक, मौलाली चौक, कुंभार गल्ली, गावंडे गल्ली, जांबमुनी चौक, शास्त्रीनगर परिसर यासह प्रभागातील विविध भागांतून काढण्यात आली. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करून उमेदवारांचे स्वागत केले. उमेदवारांची ओवाळी करत पेढा भरवला. यावेळी महिलांच्या हातातील भगवे झेंडे, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि घोषणांनी संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या या भव्य शक्तीप्रदर्शनाने भाजपाच्या प्रचाराला निर्णायक उंची मिळाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
राज्य तसेच केंद्र सरकारच्या भरीव योजनांच्या आधारे आम्ही जनतेकडे मतदानरुपी आशीर्वाद मागितले आहोत. या विजय संकल्प रॅलीचे प्रभाग क्रमांक १७ मधील विविध नगरांमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यामुळे आमचा विजय निश्चित मानला जात आहे असा विश्वास उमेदवार भारत सिंग बडूरवाले आणि रवी कय्यावाले यांनी व्यक्त केला.


















