अक्कलकोट – अक्कलकोट नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. मात्र भाजप विरोधी पक्षातील सर्व नेत्याने आघाडी करून तगडा उमेदवार देण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. सध्या सर्वच पक्षात गनिमी कावा या पद्धतीने वरून दोस्ती आतून कुस्ती’ सुरू आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण? यातून कसा आणि कोणता मार्ग काढतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याने यंदा नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
अक्कलकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वात जास्त इच्छुकांची संख्या भाजपमध्ये आहे. विरोधी पक्ष याच संधीचा फायदा कितपत उचलतो आणि याला जनता कितपत प्रतिसाद देते, यावर भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. नगराध्यक्ष उमेदवार निवडताना भाजपाची ‘सत्वपरीक्षा’ आहे. तर विरोधकांनाही ही निवडणूक ‘सोपी’ नाही. भाजपाचे मित्र पक्ष राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे (अजित पवार) आणि आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे हे भाजपासोबत राहतील. मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शिवसेना शिंदे गटाचा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा युती होणे अशक्य आहे.या पार्श्वभूमीवर इतर सर्व पक्ष मिळून आघाडी करण्याचे हालचाली वाढल्या आहेत. यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना (शिंदे गट) काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील , राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबु, शिवसेना (उवाठा)तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, रासपचे तालुका अध्यक्ष दत्ता माडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र विरोधकांची ‘नजर’ भाजपा अंतर्गत ‘नाराजी’ वर आहे. भाजपा अंतर्गत मंडळींनी बंडाचे निशाण फडकवल्यावर आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरविणार असून यावरही बरेच काही अवलंबून आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे कधीही कोणाबद्दल राजकीय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. मात्र त्यांनी अधिक प्रभावी खेळी तून योग्य मार्ग काढत असतात.
भाजप कडून नगराध्यक्ष उमेदवारी मिळण्यासाठी स्थानिकांपासून ते वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावले असून यामध्ये मिलन कल्याणशेट्टी आणि माजी उप नगराध्यक्ष महेश हिंडोळे यांचा समावेश आहे. आमदर सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधु मिलन कल्याण शेट्टी ‘रॉयल ‘नगरसेवक म्हणून लोकप्रिय आहेत. सध्या ते युवकांचे ‘आयकॉन’ आहेत. शहरात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांचेही नाव नगराध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. आजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे हे भाजप पक्षाचे निष्ठावंत कणखर नेतृत्व असलेले एक सामान्य कार्यकर्ता अशी ओळख आहे. मागील निवडणुकीत ते मनाचे मोठेपण दाखवत उमेदवारी माघारी घेतल्याने यांचाही नाव चर्चेत आहे.याशिवाय भाजपाचे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन आणि माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे हे भाजपकडून इच्छुक आहेत.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे नगराध्यक्षसह नगरसेवक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्याचे निर्णय घेतला असून यांच्याकडे माजी उपनगराध्यक्ष अशपाक बळोरगी आणि माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी उमेदवार मागणी केले आहे.

माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले असून भाजपा कडून सर्वाधिक काळ नगरपालिका मध्ये खेडगी कुटुंब सत्तेत आहे.भाजपाच्या माध्यमातून एकाच खेडगी घराण्यातील तीन लोक नगराध्यक्ष बनले आहेत. माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांचा दांडगा जनसंपर्क, अक्कलकोट कॉलेजचे चेअरमन, सर्व धर्मीय लोकांशी सलोख्याचे संबंध फार मोठे सामाजिक कार्य आहे. मात्र पक्षांतर्गत वादामुळे ते काही काळ अलिप्त आहेत आता पुन्हा ते भाजपाचे दावेदार असणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.