वेळापूर – आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस सहकारनगर अकलूज यांच्यावतीने वेळापूर येथील इंग्लिश स्कूल वेळापूर येथे रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तगट तपासणी शिबिरात इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. या उपक्रमासाठी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर.बी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वर्गाची मदत झाली. या शिबिरात रक्तगट तपासणी करण्यासाठी प्रा. निलेश कुमार आडत व बीएससी प्राणीशास्त्र तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.पूनम पिसे, कु. सायली पिसे ,कु. पूनम कचरे यांचे मोलाचे योगदान लाभले.
























