श्रीनगरमध्ये आज, मंगळवारी झेलम नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघाताच्या वेळी नौकेत 20 जण होते त्यापैकी 8 ते 10 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिलीय.
यासंदर्भातील माहितीनुसार, श्रीनगरच्या गंडबल नौगम भागात मंगळवारी सकाळी एक बोट उलटली आहे. चार जणांचे मृतदेह सापडले आहेत, अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. या बोटीत बहुतांश मुले प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य सुरू केलेय. श्रीनगरचे डीसी डॉ. बिलाल मोहिउद्दीन भट यांच्या सूचनेनुसार बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. आतापर्यंत 4 मृतदेह हाती आले आहेत. तर 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.