जालना – बदनापूर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत गोवंशाची अनधिकृत कत्तल करणाऱ्या चार आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ६२५ किलो गोमांस किंमत अंदाजे ₹1,25,000/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की, बदनापूर येथील कुरेशी मोहल्ल्यात काही व्यक्ती गोवंश जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री करत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, त्या ठिकाणी खालील आरोपी पकडले गेले –
- शेख लाल कुरेशी (वय 46 वर्षे)
- आयाज करीम कुरेशी (वय 27 वर्षे)
- शफिक अब्बास कुरेशी (वय 45 वर्षे)
- शेख रफिक शेख छोटू (वय 50 वर्षे)
(सर्व रा. कुरेशी मोहल्ला, बदनापूर)
छाप्यामध्ये आरोपींकडून सुमारे ६२५ किलो गोवंशाचे मांस जप्त करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
ही कारवाई मा. श्री. अजयकुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक जालना, व मा. श्री. अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बदनापूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत सपोनि श्रीमती स्नेहा करेवाड, पो.उप.नि. श्री संतोष कुकलारे, स.फौ. संतोष सावंत, स.फौ. बाबासाहेब जऱ्हाड, पोहेकॉ. अंकुश दासर, पोहेकॉ. प्रताप जोनवाल, पोहेकॉ. रंजीत मोरे, पो.कॉ. पुनमसिंग गोलवाल, पो.कॉ. एस.जे. तडवी, पो.कॉ. ढगे, पो.कॉ. इरफान शेख आणि म.पो.कॉ. रुपाली पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
बदनापूर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांत समाधानाची भावना व्यक्त होत असून, अशा अवैध कत्तलींवर लगाम बसण्यास मदत होणार आहे.
बदनापूर पोलिसांचे कौतुक! नागरिकांकडून “पोलिसांच्या तत्परतेमुळे कायद्याला न्याय मिळतोय” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.



















