अर्थात वुमन प्रिमियर लीगची फायनल झाली आहे. यंदाची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने जिंकली. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटलमध्ये फायनल मॅच झाली. आठ विकेटने आरसीबीने दिल्लीच्या टीमला हरवलं. दिल्ली कॅपिटलने सुरुवातीला बॅटिंग केली. 113 धावांचं टार्गेट त्यांनी आरसीबीला दिलं. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने दोन विकेट गमावल्या. पण अखेर ही मॅच जिंकली. या मॅचनंतर आरसीबीची कॅप्टन स्मृती मानधना हिचं सर्वत्र कौतुक होतंय. सोशल मीडियावर स्मृती मानधनाचीच चर्चा पाहायला मिळतेय. या चर्चांमध्ये स्मृतीचा एक फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे.
‘तो’ फोटो प्रचंड व्हायरल
आरसीबीने WPL 2024 चं जेते पद पटकावल्यानंतर स्मृतिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पण बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकाने स्मृती सोबतचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गायक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याने WPL 2024 चा कप हातात घेतलेला फोटो शेअर केलाय. या फोटोत स्मृतीदेखील दिसते आहे. त्यामुळे हा स्मृतीचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.