नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक बळकटी देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्यामुळे पात्र प्रत्येक महिलेच्या खात्यावर पहिला हप्ता 3000 रुपयाचा मिळालेल्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिलांचा साडीचोळी देऊन रक्षाबंधनाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सन्मान केला आहे . नांदेड दक्षिण मध्ये हा कार्यक्रम आज पार पडला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वचनपुर्ती करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत रक्षाबंधन निमित्ताने माता भगिनी यांच्या सन्मान सोहळा सिडको येथे उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या निवासस्थानी व उपशहरप्रमुख पप्पू गायकवाड आणि शहरसंघटक दशरथ कंधारे यांनी कार्यक्रम नियोजित केला होता.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर ,जिल्हा संघटक शंकर पिनोजी, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहरप्रमुख सुहास खराणे पाटील, तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे ,अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख शिराज भाई, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख रुपेश बारडकर,मुख्यमंत्री जनकल्याणचे बालाजी गाडगे, महिला आघाडी तालुकाप्रमुख स्नेहाताई पाटील, सिडको महिला शहरप्रमुख रूपालीताई कुलकर्णी, दिक्षाताई वंनजे,एकनाथ सर, जेष्ठ महिला लक्ष्मीबाई, गादेवार यांच्या सत्कार करण्यात आला.