वैराग – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील ज्ञानेश्वर सुभाष डोईफोडे यांनी १३५ वी रँक मिळवून घवघवी यश मिळवले सुर्डी सह परिसरातील गावात सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही शिक्षणाची कास धरून अधिकारी होणे हे फार मोठी गोष्ट आहे.
हेच बार्शी तालुक्यातील सुर्डी गावातील ज्ञानेश्वर डोईफोडे व अक्षय काळे यांनी १००वी रँक घेत सहाय्यक आयुक्त स्टेट टॅक्स या क्लासवन पोस्ट काढून दाखवले, ज्ञानेश्वर डोईफोडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सुर्डी व माध्यमिक शिक्षण दिलीपराव सोपल विद्यालय सुर्डी येथे झाले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण शेळगाव येथे झाले ज्ञानेश्वर डोईफोडे हे २०१६ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत आतापर्यंत त्यांनी ३५ वेळा मेन्स दिली होती परंतु त्यांना अपयश येत होते. त्यांना २०२४ मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून यश मिळाले, त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला आणि २०२५ मध्ये क्लासवन पोस्ट काढली आहे.
मनामध्ये जिद्द आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्मी असेल तर तुमची आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती कशीही राहू द्या त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम व्यक्तीवर होत नाही व तो अखंड ध्येय पूर्ण करण्याच्या आसक्तीने त्या दृष्टिकोनातून अपार कष्ट करतो व यश मिळवतो. तसे पाहायला गेले तर जीवनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही कि ती माणसाला आयुष्यभर रखडवून ठेवेल किंवा यशापासून दूर ठेवेल. कारण परिस्थिती ही बदलत असते परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नियोजन करून कष्ट देखील करावे लागतात व त्यातून मार्ग काढून यशाचे शिखर गाठावे लागते.
याच अनुषंगाने जर आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षांची तयारी करतात. म्हटले जाते की या परीक्षांच्या तयारीसाठी खूप व्यवस्थित पद्धतीचे वातावरण किंवा कोचिंग क्लासेसची आवश्यकता असते असे ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी सांगितले.




















