कुर्डूवाडी – कुर्डूवाडी नगरपालिका निवडणूकीमध्ये राष्टृवादी काँग्रेस (अ.प.) , शिवसेना (ए.शि) व शिवसेना (उबाटा) या तिन्ही पक्षात तिरंगी लढत असून काटे की टक्कर होणार आहे. सुरवातीस राष्टृवादीच्या सुरेखा गोरे व शिवसेना (उबाटा) च्या जयश्री भिसे यांच्यामध्ये होणारी टक्कर ऐनवेळी शिवसेना (ए.शिं.) व राष्टृवादी काँग्रेस (श.प.) यांच्या युतीमुळे नगराध्यक्षपदासाठीच्या उमेद्वार समिरूनिसा मुलाणी यांच्या उमेद्वारीने नवे ट्विष्ट निर्माण झाले आहे.आ.नारायण पाटील यांच्यामुळे धनगर समाज तर समिरूनिसा मुलाणी यांच्यामुळे मुस्लिम समाजामध्ये फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नसून याचा फटका राष्टृवादीच्या (अ.प.) सुरेखा गोरे, शिवसेना (उबाटा) च्या जयश्री भिसे यांना बसेल का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
कुर्डूवाडी नगरपालिकेमध्ये एक नगराध्यक्ष व विस नगरसेवक पदासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली जात आहे.शहरात एकुण दहा प्रभाग आहेत.जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणण्याचा शिवसेना (उबाटा) जिल्हाध्यक्ष धनंजय डिकुळे यांचा हातखंडा आहे. सन 2001 साली डाँ.दिनेश कदम तर 2017 साली समिर मुलाणी यांना त्यांनी जनतेतून निवडून आणले असल्याने त्यांंना याबाबतचा अनुभव आहे.गतवेळीही धनंजय डिकुळे यांचीच सत्ता होती.मागील तीस वर्षात एक अपवाद वगळता त्यांचीच निवीवाद सत्ता नगरपालिकेवर आहे.मात्र यावेळी त्यांना राष्टृवादी काँग्रेस (अ.प.) ,शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने पळववापळवीच्या राजकारणात खिंडीत गाठून त्यांचे अनेक संभाव्य उमेद्वार पळवून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला त्यामुळे त्यांनी जवळपास सर्वच उमेद्वार नवखे दीले आहेत. नगराध्यक्षपदासाठी कुर्डूवाडी शहराचे पहीले नगराध्यक्ष कै. काशिनाथ भिसे यांच्या सुनबाई जयश्री भिसे यांना उमेद्वारी दीली आहे. कुर्डूवाडीच्या जडणघडणीत कै.भिसे यांचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही.
यावेळची निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यासाठी प्रत्येष्ठेची ठरणार आहे.शिवसेना (ए.शि.) पक्षाची व राष्टृवादी (श.प.) पक्षाची युती झाल्याने माजी आ.संजयमामा शिंदे गटामध्ये तयार झालेले व आत्ता शिवसेनेत असलेले माढा तालुका अध्यक्ष अत्यंत चलाख म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक आनंद टोनपे यांनी राष्टृवादी (अ.प.) व शिवसेना (उबाटा ) पक्षाच्या अनुक्रमे नगराध्यक्षपदाच्या उमेद्वार जयश्री भिसे व राष्टृवादी (अ.प.) पक्षाच्या सुरेखा गोरे यांना शह देण्यासाठी मुस्लिम समाजाचे माजी नगरसेवक लतिब मुलाणी यांच्या पत्नी समिरूनिसा मुलाणी यांना उमेद्वारी देवून दोघांपुढे आव्हाण उभे केले आहे.सुरवातीस दुरंगी वाटणारी लढत आता काटे की टक्कर मध्ये रूपांतर होवून तिरंगी झाली आहे.
राष्टृवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.संजयमामा शिंदे यांनी यावेळी तिकीट वाटपापध्ये शेवटपर्यंत संस्पेन्स ठेवला.शहराची संपुर्ण जवाबदारी आर.पी.आय चे बापूसाहेब जगताप यांच्यावर सोपवली व शेवटच्या दीवशी ए.बी.फाँर्म देवून उमेद्वारी जाहीर केली.माळी समाजाचे माजी नगराध्यक्ष निवृत्ती गोरे यांच्या पत्नी सुरेखा गोरे यांना उमेद्वारी जाहीर केली.मात्र माळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पडल्याने व गतवेळी निवृत्ती गोरे यांच्यावर झालेल्या विवीध आरोपामुळे सुरेखा गोरे यांना डोके दुखी झाल्याचे बोलले जात आहे.
राष्टृवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे खा.धैर्यशिल मोहीते पाटील यांनी आ.नारायण पाटील व शिवसेना (ए.शि.) पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंद टोनपे यांच्यामध्ये दीलजमाई करत युती घटवून आणली दोन्ही पक्षांनी 10-10 च्या फाँर्मूल्यावर काम करत नगराध्यक्षपदाची
उमेद्वारी आनंद टोनपे यांनी पदरात पाडून घेतली. मुस्लिम समाजाच्या समिरूनिसा मुलाणी यांंना उमेद्वारी देवून मुस्लिम समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम समाजाच्या एका महीलेस पहील्यांदाच नगराध्यक्षपदासाठी उमेद्वारी मिळाल्याने मुस्लिम समाजात सहानभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर धनगर समाजाचे नेते आ.नारायण पाटील यांच्यामुळे देखील धनगर समाजात फुट पडू शकते असे आखाडे लडवले जात आहेत. यामुळे राष्टृवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाच्या सुरेखा निवृत्ती गोरे व शिवसेना (उबाटा) पक्षाच्या जयश्री संतोष भिसे यांच्या अडचणीत वाड होवू शकते. एकूणच दुरंगी वाटणारी ही निवडणूक आज तरी तिरंगी होणार यात शंखा नाही.
काँग्रेस व भाजपानेही निवडणूक लढवत असून काँग्रेसच्या शहराध्यक्ष फिरोज खान व हमिद शिखलकर यांनी मनिषा गवळी यांना तर भाजपने माधवी गोरे यांना उमेद्वारी दीली आहे.




















