तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : माढा तालुक्यातील अरण गावात १० वर्षांच्या शाळकरी मुलाची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कार्तिक बळीराम खंडागळे असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, तो १५ जुलै रोजी शाळेच्या मैदानावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता.
कालव्यात त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह रक्ताने माखलेला होता आणि त्याचा चेहरा ओळखू न येण्याजोगा झाला होता. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कार्तिकच्या अपहरणानंतर त्याचे आई-वडील आणि नातेवाईकांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तो कोणत्याही वैराश्याशिवाय खेळण्यासाठी गेला होता, हे सांगून नातेवाईकांनी घटनेमागे पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त केला आहे.