तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड घनसावंगी: तालुक्यातील गावागावांत समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून काढत आहे. रविवारी साकळगावात भारतीय जनता पार्टीच्या १६२ व्या शाखेचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास गावातील जनतेनी मोठा प्रतिसाद मिळाला.
तळागाळातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते समर्पण वृत्तीने काम करत असल्याने गावागावात सर्व घटकातील जनता भाजपसोबत जुडत आहे. येणाऱ्या काळात घनसावंगी विधानसभेत परिवर्तन निश्चित होणार, असा विश्वास सतीश घाटगे यांनी याप्रसंगी बोलताना दिला.
साकळगावातील शाखा उदघाटन प्रसंगी असंख्य युवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. नूतन शाखेतील सर्व पदाधिकारी, सदस्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सर्वांचे सतीश घाटगे यांनी पक्षात स्वागत करून सत्कार केला.
यावेळी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष, गोविंद आर्दड, विकास शिंदे, माधव टेहळे, ज्ञानेश्वर काळे, रामेश्वर गरड,भगवान तौर, हनुमान आर्दड,किसन कोरडे, गणेश कोरडे,राम साबळे, विकास साबळे, शाखाध्यक्ष रमेश जाधव,
राजेभाऊ देशमुख, भिमराव जाधव, नामदेव वाघमारे,विशंभर चव्हाण, सुदाम धोत्रे, विष्णुपंत गाडेकर,संतोष वाळके,रोहित मुळे अशोक गाडेकर, संतोष हरदास, बालाजी काकडे, भागवत खाडे, नानाभाऊ शिकारे, रोहित मुळे, बाबासाहेब वाघमारे, पिनू भले, रामदास धोत्रे, रामजी मोगरे, दत्ता माने, श्याम काळे, सुभाष पांढरे, ज्ञानेश्वर नाईकनवरे, सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.