सोलापूर – 103 वर्षाचा ब्रिटिश कालीन पूल पाडण्याच्या कामाकरिता 200 टनाचे दोन मोठे क्रेन मागविण्यात आले आहेत. रविवार पुलाच्या पाडकाबाब मध्ये हे क्रेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पूल पडकामाची जबाबदारी इंदोरच्या आयसीसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत दिली आहे. पूल पाडण्यासाठी कोल्हापूरहून दोन सीटर क्षमतेचे तीन क्रेन मागविण्यात आले आहेत. यासाठी 300 हून अधिक कर्मचारी रविवारी काम करतील. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत हे काम चालणार आहे. या कंपनीने आतापर्यंत 50 हून अधिक पुलाचे पाडकाप केले आहे.
दमानी नगर येथील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यासाठी दि. १० डिसेंबर पासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. १४ डिसेंबर रोजी हा पूल पाडण्यात येणार असून त्याकरिता 70 टक्के काम झाले आहे. तांत्रिक कामे शनिवारी पूर्ण करण्यात आली. रविवारी दुपारी हा पूल पाडला जाणार आहे.
शनिवारी सुरुवातीला पुलावरील काँक्रीट काढले, त्यानंतर खालच्या बाजूचे सपोर्ट देऊन वरच्या बाजूने गॅस कटरने गरडर कट करण्यात आले. गॅसने कटिंग झाल्यानंतर क्रेनच्या साह्याने ते उचलून काढण्यात आले. पूल पाडकाम करताना रेल्वे रूळ बाधित होणार नाही याची काळजी रेल्वे कडून घेतली जाणार आहे. रविवारी सकाळी मेगा ब्लॉक घेतल्यानंतरच पुलाखालील बाजूस रुळावर पत्रे व प्लॉट टाकण्यात येणार आहे. यामुळे रुळास कोणतीही बाधा होणार नाही. पूलाचे पाडकाम झाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने सर्व साहित्य रुळावरून हटविण्यात येणार आहे.
चौकट
या गाड्या करण्यात आल्या रद्द
होस्पेट – सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर – होस्पेट एक्सप्रेस, सोलापूर – पुणे एक्सप्रेस, वाडी – सोलापूर डेमू, सोलापूर – दौंड डेमू स्पेशल, हडस्पर – सोलापूर डेमू, दौड – कलबुर्गी डेमू स्पेशल, सोलापूर – कलबुर्गी डेमू, कलबुर्गी – दौंड विशेष
चौकट
या गाड्या येणार वळविण्यात
पंढरपूर – मैसूर गोलगुंबज एक्सप्रेस ही पंढरपूर-मिरज-लोंढा-हुबळीमार्गे वळविण्यात येणार
विजयपूर – रायचूर पॅसेंजर विजयपूर-होटगी-वाडीमार्गे वळविण्यात येणार
रायचूर – विजयपूर पॅसेंजर ही वाडी – होटगी – विजयपूरमार्गे वळविण्यात येणार
सीएसएमटी मुंबई – बेंगळूरु उद्यान एक्सप्रेस ही पुणे-मिरज-लोंढा-हुबळी-गदग-होस्पेट-बल्लारी-गुंटकलमार्गे वळण्यात येणार
एलटीडी मुंबई – विशाखापट्टणम एक्सप्रेस ही कुर्डूवाडी-लातूर-लातूर रोड-खानापूर-विकराबादमार्गे वळविण्यात येणार
पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस ही कुर्डूवाडी-लातूर-लातूर रोड-बिदर-विकाराबादमार्गे वळविण्यात येणार


















