धाराशिव – तेरणा पब्लिक स्कूल धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी धाराशिव जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल धाराशिवचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. यामध्ये स्कूलच्या चार विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत विशेष प्राविण्य प्राप्त केले.
इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी संपत्ती पाटील, पाचवीची कुमारी कादंबरी पाटील, इयत्ता आठवीची कुमारी भाग्यश्री पवार व सायुरी सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच स्कूलमध्ये देखील त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग देखील उपस्थित होता. या स्पर्धेसाठी स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री विवेक महाजन सर यांनी विशेष अशी मेहनत घेतली.

























