श्रीपूर – मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथम मराठीतून दर्पण वृत्तपत्र चालू केले तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधत येथिल ब्रिमा सागर डिस्टलरीज महाराष्ट्रचे वतीने येथिल श्रीपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुखदेव साठे , जेष्ठ पत्रकार बी . टी . शिवशरण , महादेव जाधव , दत्तात्रय नाईकनवरे , विजयकुमार देशमुख , प्रकाश केसकर , विनायक बागडे , दादा माने यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी बी . टी . शिवशरण , महादेव जाधव , दत्तात्रय नाईकनवरे यांनी श्रीपूर मध्ये असणारे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखाना व ब्रिमा सागर डिस्टलरी या उद्योगा मुळे श्रीपूर व परिसराला सप्पन्नता लाभली आहे .
आज ब्रिमा सागर कंपनी शतकोत्तरी कडे वाटचाल करीत आहे . कंपनीचे मालक दिपक कोठारी , व्यवस्थापकीय संचालक भरतकुमार सेठीचा यांच्या मार्गदर्शना खाली जनरल मॅनेंजर दिनकर बेंबळकर यांनी उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर कंपनीला वैभव शाली बनवले असून कंपनीच्या माध्यमातून अनेक कुटूंबाला रोजगार उपलब्ध होत असून केवळ या उद्योगांमुळेच या परिसराचा विकास झाला असल्याचे आपल्या मनोगता मध्ये भावना व्यक्त केल्या .
याप्रसंगी उप व्यवस्थापक चंद्रकांत भागवत ,नरेश पाठक , सुकुमार मंडल , इलेक्ट्रीक इंजिनिअर सत्यजित पाटील , रसायन तज्ञ अमित तळवळकर , सुरक्षा अधिकारी भागवत पारसे , श्रीपाद कुलकर्णी , गणेश विभूते उपस्थित होते .
सुत्रसंचालन नरेश पाठक यांनी तर आभार पत्रकार संघांचे अध्यक्ष सुखदेव साठे यांनी मानले .
श्रीपूर पत्रकारांचा सत्कार प्रसंगी दिनकर बेंबळकर , नरेश पाठक , चंद्रकांत भागवत .




















