ठाणे, 16 जुलै (हिं.स.) सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय असणारे प्रख्यात उद्योजक सुहास नारायण मेहता यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा नारायण मेहता वय ९२ वर्षे यांचे राहत्या घरी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुहास, सुन निलिमा ,नातु अमेय नातसून शिवानी, नातवंडे डॅा.आर्या व डॅा. स्वप्निल मुलगी सुलभा व जावई असा परिवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार निरंजन डावखरे यांनी घरी भेट देऊन मेहता कुटुबियांचे सांत्वन केले.
ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी पूर्ण वैष्णव गुजराती समाज, महाडवाशी व विविध खात्यातील अधिकारी वर्ग व व्यवसायातील मित्र मंडळी,आयआयटी व व्हीजेटीआय संस्थेतील प्राध्यापक, सुहास मेहता यांचे आयआयटी मधील मित्र व संपुर्ण एसएमसी इन्फ्रा. कंपनीचा परिवार आदीसह विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.