सोलापूर – प्रभाग क्र. 4 मधील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीमुक्त परिसर व स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कामास सुरुवात झाली.गेल्या 40 वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीस अखेर यश आले असून, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने व प्रभागातील भाजप नेते अनंत जाधव यांच्या अथक पाठपुराव्या मुळे तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक विनायक विटकर, राजाभाऊ काकडे, सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड, गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 4 मधील भाजप चे गणेश साखरे, नितीन कुलकर्णी, अप्पासाहेब लकशेट्टी, जगदीश कोरे, देविदास चेळेकर, शिवानंद कुंभार, गिरीष महमने, हिरा अटे, अनिकेत अल्कुंते, श्रीकांत कत्तीमनी, महेश जगदाळे, बालाजी भिंगारे, अविनाश सुरवसे, राजेंद्र काळे हेही उपस्थित होते.

प्रारंभी विकास कामाचा शुभारंभ फलकाचे उद्घाटन आणि कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तदनंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यानंतर अनंत जाधव यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी भल्या मोठ्या हारणे सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप नेते अनंत जाधव म्हणाले, 40 वर्षापासून ची मागणी आता कुठे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यामुळे मार्गी लागली. मराठा वस्तीत पावसाळ्यात संपूर्ण घाण पाणी वर यायचे, सर्व मराठा वस्ती मधील नागरिकांना याचा त्रास व्हायचा. 2012 मध्ये मी नगरसेवक झालो त्यावेळेस जास्त काम करता आले नाही, येणाऱ्या काळात प्रभागातील सर्वांसाठी भरपूर काम करायचे आहे.
ज्या पद्धतीने राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे भाऊ देव भाऊ आहेत त्याच पद्धतीने प्रभाग चार मध्ये लाडक्या बहिणीचे भाऊ हे अनंत नेता आहेत. या भागातून अनंत जाधव हे नगरसेवक व्हावेत यासाठी लाडक्या बहिणी सोबत ज्येष्ठ नागरिक, युवक यांनी त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहावे. अनंत जाधव हे प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवतील अशी अपेक्षा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार, भाजप माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील सर्व योजना राबवण्याचे काम शहर उत्तर मध्ये केल. प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणला, सर्वसामान्यांचे कामे व्हावेत ही अनंत जाधव यांची तळमळ असते. अनेक विकास कामे त्यांनी केली असून आगामी काळात नगरसेवक च्या माध्यमातून त्यांनी हीच समाज सेवा करावी असे मत आमदार देशमुखांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव चव्हाण, मल्लू हिरेमठ, अतुल शिरसाट, अमित लोंढे, शिवकुमार कोळी, अप्पा बुरांडे, युवा सुरवसे, सूरज भोसले, आदर्श बंडगर, सोनू हूच्चे, अजय वलेकर, रोहित सुरवसे, आबा शिरसट, अनिकेत आवताडे, रवी सातपुते, विश्र्वा तंबाके आदी सह अनंत नेता जाधव मित्र परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.