अक्कलकोट – अक्कलकोट मधील पेंटर काम करणारे मजूर यांना संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बाधकाम कामगार इमारत महामंडळाचे कार्ड मोफत नूतनीकरण करून देण्यात आले लाभार्थी शेखर देढे , आनंद गवळी हे पेंटिंग चे काम करत असल्याने त्यांना संघटनेच्या वतीने मोफत कार्ड नूतनीकरण करून देण्यात आले मजुरांचे नोंदणी झालेले कार्ड प्रत्येक वर्षाला नूतनीकरण करावा लागणार आहे कारण नूतनीकरण संपलेलं कार्ड त्या मजुराला कुठलाही लाभ मिळू शकत नाही.
जोपर्यंत नूतनीकरण करत नाही तोपर्यंत कामगारांचा कार्ड इन ऍक्टिव्ह असं दाखवल्याने कुठलाही लाभ कामगारांनी घेऊ शकत नाही म्हणून संघटनेच्या वतीने काम करणारे मजुरांना प्रति वर्षाला नूतनीकरण करून देण्यात येईल नोंदीत कार्ड मुजरांना नूतनीकरण करून दिल्यास पाच लाखाचा विमा लागू राहील आणि संपलं तर पाच लाखाचा विमा कामगारांना मिळणार नाही कामावरती काम करत असताना अपघात झाला तर मजुरांना ५ लाखाचा विमा त्यांच्या वारसांना दिलं जातं शासनाकडून त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांना प्रतिवर्षी पाच वर्ष २४ हजार रुपये मदत शासनाकडून मिळेल व अन्य फायदे शासनाकडून होणार आहेत.
यावेळी उपस्थितवंचित बहुजन माथाडी कामगार संघटना तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे ,वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना तालुका सरचिटणीस अमोल शिंदे ,वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना शहराध्यक्ष वसीम खासबागदार, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना तालुका उपाध्यक्ष गजानन घोडके आणि वंचित चे कामगार संघटनेचे सदस्य नागोरे कारंजा चौक येथे नूतनीकरणचे पत्र देऊन स्वागत करते वेळेस पदाधिकारी उपस्थित होते