सांगोला – फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये शुक्रवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन सुरेखा रूपनर, सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील, प्रियाका पावसकर, वनिता बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनी रुद्राणी ठोंबरे हिने गीत सादर केले. तसेच शिक्षिका विद्या नरुटे, शिक्षक दयानंद चांडोले यांनी बालदिना विषयी माहिती देत बडबड गीते, नाटक, नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोडक यांनी केले. उपस्थितांचे आभार नुजहत शेख यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


















