माढा – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती दिपावलीप्रमाणे घरोघरी उत्साहात साजरी करावी असे आवाहन माढा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी केले आहे.
‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ यानुसार मराठा सेवा संघ, माढा तालुक्याच्या वतीने वतीने शिवजयंती घरी कशी साजरी करावी याबाबतीत पत्रक काढले आहे.शिवजयंती निमित्त लहान मुलांना नवीन कपडे खरेदी करावीत.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी दारात सडा मारून छानशी रांगोळी काढावी, घरात छान सजावट करावी,दारावर फुलांचे तोरण बांधावे,राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा मांडाव्या, घरात गोड धोड, पुरणपोळी करावी, शिवप्रतीमेला हार अर्पण करून शिवपूजन करावे,जिजाऊ वंदना म्हणावी,सोबत जिजाऊ चरीत्र, शिवचरित्र ठेवावे, पुरणपोळीचा पहिला मान शिवरायांना द्यावा, शिवचरित्राचे वाचन करावे,आपले शेजारी, मित्र, सहकारी यांना निमंत्रित करावे,शिवचरित्र भेट म्हणून द्यावे.
घरची शिवपूजा उरकून मग सार्वजनिक शिवजयंती मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सेवा संघ माढा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी केले आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,तालुका सचिव इंजि.सुरज मोहिते,उपाध्यक्ष मनोज पवार, शिवाजीराव गवळी, कोषाध्यक्ष शंकर गवळी, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महादेव थोरात, सहसचिव दत्तात्रय गरदडे, संघटक कुलदिप खटके, संघटक आनंद उंडे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, मोडनिंब शहराध्यक्ष शेखर सुर्वे, टेंभुर्णी विभाग अध्यक्ष विलास कोठावळे,माढा विभाग अध्यक्ष शिवानंद बारबोले, उपाध्यक्ष नागेश व्यवहारे,यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.





















