सोलापूर – भारतीय योग संस्थान दिल्ली रोहिणी सोलापूर शहर जिल्हा अंतर्गत जागतिक महिला दिन 15- 3 -2026 रोजी मार्कंडेय उद्यान केंद्र येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय योग संस्थांचे जिल्हा प्रधान शेखर लक्ष्मणेश्वर सर , जिल्हा मंत्री सौ लक्ष्मी दोरनाल, संघटन मंत्री सौ कांचना श्रीराम, तसेच एकूण सहा केंद्राचे केंद्रप्रमुख , उपकेंद्र प्रमुख व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख पाहुणे नूतन नगरसेवक सत्यनारायण गुर्रम आणि विजय चीप्पा, हास्य कलाकार चार्ली अंबादास कनकट्टी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत त्यांचे सत्कार सरस्वती पूजा त्रिवार ओंकार गायत्री मंत्र व भक्ती गीत सादर आणि डेमो सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वाटप करण्यात आले.

























