मंगळवेढा – श्री दत्त जयंतीनिमित्त मंगळवेढा शहर व तालुक्यात विविध ठिकाणी मंदिरांमध्ये मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.
मंगळवेढा शहरातील ढवळस रोडवरील तायाप्पा करे महाराज निवासस्थानातील दत्त मंदिर,स्वामी समर्थ मंदिर,शनिवार पेठ,गोविंदबुवा मंदिर शनिवार पेठ,ढवळस रोडवरील स्वामी समर्थ मंदिर,उजनी वसाहतीतील दत्त मंदिर,जिल्हा परिषद बांधकाम विभागातील दत्त मंदिर,श्री संत दामाजी मंदिर,दामाजी चौकातील हॉटेल वंश दत्त मंदिर,कोंडुभैरी गल्ली,डोंगरगांव रोडवरील प्रभूदेव आकळे दत्त आश्रम,भाळवणी, डोंगरगांव, कचरेवाडी, आंधळगांव तसेच अनेक ग्रामीण भागात मोठया उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.

अबाल वृद्ध भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात भाविक भक्तीत लिन झाल्याचे दिसत होते. श्री दत्त जयंती निमित्त गुरुदेव दत्तात्रय महाराजांचा दर्शनाचा लाभ घेतला.
काही ठिकाणी दुपारी 12.00 वा. तर काही ठिकाणी सायंकाळी 6.00 वा. तसेच
तायाप्पा करे महाराजा चे दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अभिषेक, प्रवचन, नामस्मरण, पाळणा व पुष्पवृष्टी झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

























