सोलापूर – सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्ताने थैमान घातले असताना अनेक सामाजिक संघटनेने मदतीचा हात पुढे केला.यावेळी फॅमिली प्लॅनिंग असोसिएटने या पूरग्रस्ताच्या ठिकाणी मेडिकल कॅम्पच्या आयोजन करण्यात आले होते.त्याचा समारोप प्रसंगी आलेले केंद्रीय पथकचे भारतीय जैन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा, भारतीय जैन संघटना सोलापूर, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सा विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय व इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 48 पूरग्रस्त गावात आरोग्य शिबिराचे आयोजनाने अनेक रुग्णांना प्रजनन आरोग्य व कुटुंब नियोजनाची तपासणी करून औषधोपचार केलेले आहेत. या आरोग्य शिबिराचे तपासणी करण्यासाठी पाकणी येथे IPPF चे केंद्रीय अधिकारी डॉ. अपूर्वा रुस्तोगी, मुंबई मुख्यालयाचे अधिकारी डॉक्टर अमित किटुकुले, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर श्री नागनाथ तेली, FPA. चे डॉ. सुगतरत्न गायकवाड पाकणीचे सरपंच व उपसरपंच आधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार भारतीय जैन संघटनेचे वतीने श्याम पाटील व अभिनंदन विभूते यांनी केले.
या आरोग्य शिबिरासाठी विविध सामाजिक संस्था मदत केल्याबद्दल त्यांचा हॉटेल चित्र एक्झिक्यूटिव्ह सम्राट चौक येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील व मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते यांचा सत्कार करताना IPPF चे केंद्रीय अधिकारी डॉ. अपूर्वा रुस्तोगी, मुंबई मुख्यालयाचे अधिकारी डॉक्टर अमित किटुकुले, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, श्री शक्ती सागर ढोले, श्री नागनाथ तेली,FPA. चे डॉ. सुगतरत्न गायकवाड व त्यांचे स्टॉप उपस्थित होते.
आरोग्य शिबिर मध्ये सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष माया पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण सोळंकी, देशभूषण व्हसाळे, अशोक भालेराव, कोमल पाचोरे, प्रशांत वर्धमाने, पंकजा पंडित, निशा गांधी , मानसी शहा, वर्षा जैन, निर्मला मेहता आदींनी परिश्रम घेतले.





















