अक्कलकोट – मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्या साठी अक्कलकोट तालुक्यात शिरवळ या गावी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात तल्लीन झाले. तर गटविकास अधिकारी शंकर कवितके दहिटणे या गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. याशिवाय तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सात गावात मुक्काम करून महास्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान केला.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे मुक्कामी असलेले सिईओ जंगम भल्या पहाटे बांधावर जाऊन ग्रामस्था समवेत वृक्षारोपण केले. रात्री मुक्कामावेळी सिईओ जंगम यांनी घोंगडी बैठकीतून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांसमवेत हरिनामाच्या भजनात सिईओ जंगम तल्लीन झाले होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शिरवळ येथे प्रेरणादायी उपक्रम राबविली असून सायंकाळी ७ वा. ग्रामस्थांसमवेत मशाल फेरी आयोजित करण्यात आली. त्यानंतर ८ वा. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. या वेळी सुरेश पवार मरवडे व संजय पाटील (विस्तार अधिकारी, अक्कलकोट) यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिवराज राठोड (ग्रामपंचायत अधिकारी) यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास सरपंच सौ. आशाताई शरणबसप्पा बिराजदार, उपसरपंच सौ. पूजा चंद्रकांत कवडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी श्री. अभय नेलुरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांनी कडबगाव येथे मुक्काम केला. तालुका आरोग्य अधिकारी आश्विन करजखेड यांनी जेऊर येथे मुक्काम केला.जि.प. बांधकाम उपअभियंता श्रीमती उषा बिडला यांनी केगाव बु.येथे मुक्काम केला. जलसंधारण उपअभियंता एस एस उंबरजे यांनी हत्तीकणबस येथे मुक्काम केला.पाणी पुरवठा उपअभियंता विद्याधर राठोड यांनी सदलापूर येथे मुक्काम केला.कृषी अधिकारी विनायक तवटे खानापूर येथे मुक्काम केला.या विभाग प्रमुखांनी विविध वरील सात गावात मुक्काम करून जनजागृती केली.