बार्शी – सोलापुरातील शेळके येथील ऍड. चाँदपाशा बासुमियाँ शेख यांची, सोलापूर येथील बार कौन्सिल हॉलमध्ये शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी शेतकरी संघटनेच्या वकील आघाडीच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली.
त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख विजय रणदिवे, बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर, रामहरी पेजगुडे, युवा जिल्हाध्यक्ष मोसिन महमूद पटेल, ऍड. बापूसाहेब देशमुख, ऍड. रोहिदास पवार, ऍड.असीम बागी, ऍड. संजय गायकवाड, ऍड. बी.डी. मनसावले, ऍड. डी.एन. मैंदरकर, ऍड. असिफ शेख, ऍड. संजय काळे आदींसह बहुसंख्य वकील व शेतकरी उपस्थित होते. ऍड. चाँदपाशा शेख हे गोरगरिबांच्या केसेस अत्यल्प फीमध्ये लढवत असल्यामुळे त्यांची शेतकरी संघटनेच्या वकील आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली असल्याचे शंकर गायकवाड यांनी सांगितले ्

























