मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता देण्यात आली.
एका याचिकेवरील निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अधिनियम, नियम, नियमावली, उपविधी इत्यादीमधील मानहानीकारक असे शब्द बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1959 मधील कलम 9 व 26 मध्ये सुधारणा करण्याची शिफारस विधि व न्याय विभागाने केली आहे. त्यानुसार या अधिनियमातील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळण्यास व त्यानुषंगाने अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.


















