अभ्यास करण्यास टाळाटाळ करू नका : बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी उद्याचा अभ्यास पुढे ढकलण्याच्या सवयीपासून दूर राहा. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवस आधी अंतिम उजळणी केल्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी ताण येणार नाही.
अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या : बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे लक्ष दया. अभ्यास करताना नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून बसा.
वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे : एसएससी, एचएससी, सीबीएसई, आयसीएसई, आरबीएसईच्या कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर वेळेचे व्यवस्थापन करा.
सोशल मीडियापासून दूर राहा : सोशल मीडियाचा वापर करताना वेळेवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे आत्तापासूनच सोशल मीडियापासून दूर राहा.
तुमच्या सवयींमध्ये सुधारणा करा : बोर्ड परीक्षेच्या तयारीदरम्यान आरोग्यदायी आणि घरी शिजवलेले अन्न खाण्याची सवय लावा. तसेच एकाग्रता आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी 7-8 तासांची झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.