तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हैदराबाद या रेल्वे गाड्या सुधारित संरचणेत धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
रेल्वे क्रमांक 12701/12702 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्सप्रेस व ट्रेन क्रमांक 22732/22731 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या ट्रेन १ वातानुकूलित, द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन व एक जनरेटर कार या सुधारित संरचनेत धावणार आहेत.
रेल्वे क्रमांक 12701 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस ही गाडी सुधारित संरचनेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २४ जुलै २०२५ पासून चालवण्यात येईल. ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्सप्रेस ही गाडी सुधारित संरचनेसह हैदराबाद येथून २५ जुलै २०२५ पासून चालवण्यात येईल.
रेल्वे क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस ही ट्रेन सुधारित संरचनेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २६ जुलै २०२५ पासून चालवण्यात येईल. ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ही ट्रेन सुधारित संरचनेसह हैदराबाद येथून २३ जुलै २०२५ पासून चालवण्यात येईल.
Post Views: 7