पंढरपू – राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या कु.चारुशीला कुलकर्णी यांचा पंढरपूर येथील नागेश फाटे संपर्क कार्यालयात उत्साहात सत्कार करण्यात आला. चारुशीला कुलकर्णी यांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी हा खास समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी, नागेश फाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चारुशीला कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी बोलताना नागेश फाटे म्हणाले “चारुशीला कुलकर्णी यांनी पक्ष संघटनेसाठी वाढी साठी आज पर्यंत मोठे काम केले आहे. त्यांच्या निवडीमुळे युवतींना अधिक प्रेरणा मिळेल, व पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असे मत नागेश दादा फाटे यांनी व्यक्त केले.
ह्या सत्कार समारंभाला अभिजित कवडे, सुप्रिया अभिजित कवडे, किशोर कवडे आणि अनिता किशोर कवडे, स्वप्नाली घोडके, हर्षा सुतार, संग्राम कापसे, विनय शिंदे आदी उपस्थित होते.
या निवडीमुळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसला अधिक बळ मिळेल आणि युवतींचे प्रश्न सोडवण्या साठी प्रभावी नेतृत्व उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला
















