अक्कलकोट – दिल्लीतील लाल किल्लाजवळील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या एका भीषण स्फोटानंतर अक्कलकोट पोलिसांनी तातडीने आज शहरातील बस स्टॅन्ड, श्री सावमी समर्थ महाराज देवास्थान,अन्न छत्र परिसर सह शहरात गर्दीच्या ठिकाणी डॉग स्कॉड व बीडीडीएस पथकाने चेकिंग केली असल्यांची माहिती पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी दिली.
धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये पेट्रोलिंग आणि नाकाबंदी तीव्र करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी सर्व प्रमुख ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कठोर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.कर्नाटक सीमाभागात, नाकेबंदीसह पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.गर्दीच्या ठिकाणी पोलीस चेकिंग मोहीम राबवत आहेत.श्री स्वामी महाराज देवस्थान परिसर व बस स्थानके, आणि बाजारपेठांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आला आहे.




















