सोलापूर – जनसेवा शिवजन्मोत्सव तरुण मंडळ दाजी ग्रुप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव 2026 च्या उत्सव अध्यक्षपदी विनोद चव्हाण यांची निवड करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भाज्यांना मोठा मध्ये दाजी ग्रुप ची बैठक सालाबाद प्रमाणे मंडळाचे आधारस्तंभ राजन जाधव, संस्थापक अक्षय जाधव व विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली.
यामध्ये उपाध्यक्षपदी अभिषेक मोरे, प्रथमेश कोरके, सचिव नीरज मोरे, सहसचिव मारुती घाडगे, खजिनदार अरबाज अन्सारी, सहखजिनदार शाश्वत जंगले, कार्याध्यक्ष ओंकार जावळे, सुजल पवार, मिरवणूक प्रमुख अक्षय बनसोडे, रोहन ताकमोगे, लेझीम प्रमुख सागर नागनगिरी, विकी व्यवहारे, रवी कांबळे, प्रसिद्धी प्रमुख आदित्य हांडे, अतिश लोखंडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























