टेंभुर्णी : येथील मध्यवर्ती शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी शहर व परिसरातील हजारो शिवभक्तांनी पुतळ्यासमोर नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त हजेरी लावत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेची ध्येयधोरणे व आदर्श शासनपद्धती यांचा स्फूर्तिदायी इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत कथन केला.
मध्यवर्ती शिवस्मारक परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने नटविण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय व उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे, तिसऱ्या आघाडीचे नेते रावसाहेब नाना देशमुख, कुटे गटाचे माजी उपसरपंच प्रमोद कुटे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे ए पी आय गणेश चौधरी, टेंभुर्णी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी परमेश्वर खरात, अकोले खुर्द पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील,माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष औदुंबर भाऊ देशमुख-महाडीक, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,भाजपचे शहराध्यक्ष नागनाथ वाघे, बंकट देशमुख सर, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर दादा पाटील, उद्योजक विलास काका देशमुख, टेंभुर्णी उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे, महेंद्र वाकसे, उद्योजक नागेश बोबडे, सापडणे टें माजी उपसरपंच दत्ताभाऊ ढवळे, छत्रपती प्रतिष्ठानचे माढा तालुका अध्यक्ष नाना ढवळे, संदिप कुटे, विशाल मस्के, राहुल टिपाले, संदिप देशमुख, बी के गायकवाड सोमनाथ काका कदम, सामाजिक कार्यकर्ते गोरख बाप्पा देशमुख, सुनिल ओहोळ, गणेश केचे, ॲड संतोष कानडे, अजीत शेख, ग्रामपंचायत सदस्य सचिन होडादे, सोमनाथ ताबे, बोबडे गट गटाचे नेते ऋषिकेश नाना बोबडे, अकोले खुर्द चे आकाश पाटील यांच्यासह फार्मसी कॉलेज अकोलेचे प्रिन्सिपल डेकणे सर, शिवस्मारक समिती प्रणित अटकेपार झेंडा प्रतिष्ठान टेंभुर्णीचे सर्व सदस्य तसेच शहर व परिसरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व स्वराज्याच्या आदर्शांचे स्मरण करत एकात्मतेचा संदेश दिला.

























