सोलापूर – मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्यावतीने सीना नदीच्या काठावरील वाकाव ता. माढा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ भेट देण्यात आल.
“शेतकऱ्यांच्या प्रती निष्ठा ठेवून काम करणारे मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान खरे मावळे म्हणून काम करत आहेत. आज राजकारणातील नेतृत्व धार्मिक तेढ निर्माण करत आहेत अशा काळात स्व:खर्चाने नैसर्गिक अपत्तीत उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद देणाऱ्या मावळयाचा आदर्शवत कामाच कौतुक आहे, असे मत ड्रॅगन उत्पादक युवा शेतकरी प्रतापसिंह ढेंगळे यांनी व्यक्त केले.”
ब्रिगेड शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, ड्रॅगन उत्पादक शेतकरी प्रतापसिंह ढेंगळे यांच्या हस्ते २०० कुटुंबियांना सर्व मिष्टान्न असा फराळ पॉकेट देण्यात आले.
याप्रसंगी शेतकरी जनार्दन कोकाटे, सुधीर कोकाटे, बालाजी कोकाटे, किरण कोकाटे, रामा कोकाटे, अनिल कदम, पांडुरंग चव्हाण, महादेव चव्हाण, विकास लोंढे, संतोष भुसारे, तानाजी सावंत, रणजित कोकाटे, दयानंद सानप, अविनाश मस्के, उतरेश्वर घाडगे, रणजित बोधले यादीनी परिश्रम घेऊन उपस्थित शेतकऱ्या सहकार्य केले.