धाराशिव – जाणीव संघटना वंचित विकास संस्थेच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयांमध्ये जागतिक मानवतादिनानिमित्त किशोर किशोरी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रस्ताविक पर्यवेक्षक बापू सावंत सर यांनी केले यानंतर व्यक्तिमत्व विकास माणसाची प्रश्न गुणवत्ता वाढीवर तसेच नेतृत्व कौशल्य वक्तृत्व कौशल्य संवाद कौशल्य यावर सविस्तर मार्गदर्शन जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी केले.
यानंतर किशोर किशोरी मुला-मुलींचे प्रश्न सध्याची मानसिकता यावरही मार्गदर्शन केले यावेळी अभिनव अभिरुची वर्ग घेऊन खेळ गाणी गोष्टी शिकवण्यात आल्या.
या मेळाव्यात नऊशे ते हजार किशोर किशोरी यांनी मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमासाठी थोरबोले एस आर मुख्याध्यापक श्री सावंत बी एम पर्यवेक्षक श्री क्षीरसागर एस व्ही.श्री रिपोर्ट एच एम डोके एस बी धारकर एस एस वाघोरे एस बी पवार बी यम पन्हाळे बीवी आदींनी परिश्रम घेतले.






















