सोलापूर – बालेवाडी पुणे येथे झालेल्या विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेतून 110मी हर्डल्स प्रकारात द्वितीय आलेल्या छत्रपती शिवाजी साय कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंथन जुगलिंगेची राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली तर याच महाविद्यालयाच्या राम शेजाळ ची पुणे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी जिल्हा स्पर्धेतून निवड झाली.
या खेळाडूंना महेश झांबरे,शिवाजी वसपटे , मारुती घोडके, नितीन गोरे प्रा संतोष गवळी, प्रा सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. हे दोन्ही खेळाडू दिवसभर काम करून शिक्षण घेत मैदानावर दररोज तीन तास सराव करतात.
यशाबद्दल मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे,सचिव महेश माने , प्राचार्य मंजुश्री सपाटे पाटील, प्राचार्य सुजाता जुगदार , प्रा आश्विन नागने , प्रा हरीश गरड, प्रा संदीप गायकवाड, प्रा गिरीश लोंढे, प्रा सौ पवार, प्रा जगन्नाथ पांढरे,रोहन हावळे, प्रशांत राणे, दत्ता सुतार यांनी अभिनंदन केले.




















