प्रतिनिधी –
भोकरदन तालुक्यासह जालना जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळालेले नाहीत.दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विध्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप केले जाते,मात्र जिल्हा परिषद शाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही विध्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश मिळालेले नाही. त्यामुळं तात्काळ विध्यार्थ्यांना गणवेश देण्याची मागणी बळीराजा फाऊंडेशनच्या वतीने गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन पाठविण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या लाडक्या भाच्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश तात्काळ उपलब्ध करून द्या.
शिक्षण विभागाकडून विध्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत मिळणार असल्याचे प्रशासन सांगत असले तरी विध्यार्थ्यांना गणवेशाविनाच शाळेत जावं लागत आहे.पुढच्या आठवड्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिवस साजरा होणार आहे,स्वातंत्र्यदिना अगोदर जिल्ह्यातील सर्व विध्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावे अन्यथा पालकांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा दिला आहे.निवेदनावर बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे,संदिप भोकरे,अमोल खांडवे, राजू साबळे,अमोल गाडेकर,राजू ढोके, निवृत्ती साबळे,श्रीराम सहाणे आदींच्या सह्या आहेत.
प्रतिक्रिया –
शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील विध्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याने विध्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिवस साजरा करायचा की नाही? येत्या आठवड्यात जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही तर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलन छेडणार आहोत.
नारायण लोखंडे – अध्यक्ष बळीराजा फाऊंडेशन
भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांना निवेदन देतांना नारायण लोखंडे,संदिप भोकरे,अमोल गाडेकर आदी.