कुर्डूवाडी – मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानातर्गत निमगाव टे येथे महीलादिनाचे औचीत्य साधून महीला सक्षमीकरण सप्ताह नुकताच संपन्न झाला असून विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या यशस्वी महीलांना ‘यशस्वी महीला गौरव पुरस्कार’ कार्यक्रमाच्या अध्यक्षा गार्गी यशवंत शिंदे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.यावेळी व्यास पिठावर भारती शिंदे,माधुरी गुटाळ,ग्रा.स.मनिषा मराठे,सुवर्णा लोंढे उपस्थीत होत्या.
@ महीलांचा आत्मसम्मान वाढावा,गावच्या सर्व क्षेत्रात सहभाग वाढावा याबरोबरच प्रत्येक गाव स्वयपुर्ण व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस यांनी सप्टेंबर 2025 रोजी पासुन ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान चालु केले आहे.त्यानिमीत्त निमगाव टे येथील विवीध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महीलांना ‘यशस्वी महीला गौरव पुरस्कार ‘देण्यासाठी महीला दीनाचे औचित्य साधून निमगांव टे ग्रामपंचायत व उमेद च्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला होता.
@ यानिमीत्ताने गावात महीला बचत गटाचे साहीत्य, प्रदर्शन व विक्री चे स्टाँल उभारण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत महीलांंची आरोग्य तपासणी यासह अनेक उपक्रम राबवले. महीलांच्या या स्टाँलला प्रणीता रणजितसिंह शिंदे यांनी भेट दीली.
@ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच यशवंत संजयमामा शिंदे ग्रामविकास अधिकारी नवनाथ दोंड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी प्रयत्न केले.
@ चौकट—
या यशस्वी महीलांचा झाला गौरव पुरस्काराने सन्मान.
* चंद्रभागा शाम कांबळे –पापड, शेवया,बचत गट मधून व्यवसायाक
* वंदना महेश नलवडे –बचत गट मार्फत लोन देऊन पार्लर अतियश उत्कृष्ट असे काम केले आहे
*मनिषा प्रशांत शिंदे – स्वता पायावर उभा राहून पूर्ण शेती नियोजन करून शेवगा लागवड व शेळीपालन हा व्यवसाय चालू केला आहे.
*माधुरी विलास देशमुख – हे स्वत शिक्षक असून त्याचे शेती मध्ने विविध फळ बाग लागवड करून व शेली पालन हा व्यवसाय करत आहेत.
*कांचन आप्पासो शिंदे – हे स्वत सर्व शेती मधील फळबाग लागवड सर्व वाहन चालून फवारणी करून सर्व शेती करत आहेत .
*ऋतुजा जवनसिंग राजपूत – यांचे MBBS शिक्षण पूर्ण केले आहे
*शाहीन जमीर मुलाणी – हिने आपल्या शिक्षणाच्या जोरावर वयाच्या 20 व्या वर्षी नौकरी लागून HDFC BANK मध्ये DPOT Manger या पद मिळवले
* दीक्षा दिलीप शिंदे – हिने बायो मेडीकॅल इन इंजीनार्रिंग करून वयाच्या 21 वर्षी cmapus मधून निवड होऊन १५ लाखाचे पकेज मिळवले .
*समीक्षा गणेश खंडाळे – शालेय स्पर्धा मद्धे जिल्हा स्तर प्रथम क्रमांक
*अनिता सतीश वरपे – शासकीय योजनेतून ब्युटी पार्लर ट्रेनिंग पूर्ण केले यासाठी सन्मान केला























