पिलीव – माळशिरस तालुक्यातील सातारा _ पंढरपूर ह्या रस्त्याचे महामार्गात रुपांतर झाले खरे पण याठिकाणी पिलीव बसस्थानकावरील अपुर्ण काम कधी पुर्ण होणार गेल्या चार वर्षांपासून ह्याठिकाणी काम अपुर्ण आहे .ना गटारीचे काम पुर्ण आहे ना डिवहायडर ना याठिकाणी बसवलेले सोलारचे दिवे सुद्धा बंदच आहे ,तर पिलीव बाजारपेठेकडे जाणारा महामार्गालगतचा रस्त्याचे काम असो ह्याला कधी मुहुर्त लागणार? या अगोदर रोडवेजकडे काम होते ते बदलुन सध्या हेच काम दुसऱ्या कंपनीकडे दिले आहे .
किमान ही कंपनी तरी याठिकाणचे काम लवकर पुर्ण होईल अशी अपेक्षा होती पण दुसऱ्या कंपनीची सुद्धा कामाबाबत निष्क्रीयता दिसुन येत आहे.पिलीव मधील नागरिकांनी याबाबत एम एस आरडीकडे लेखी तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा दिला तरीही अद्यापपर्यंत कंपनीने कोणतीही दखलच् घेतली नाही .पिलीव बसस्थानकावरील पुर्व बाजुला थोडेसे डिव्हाडरचे काम झाले आहे .पण त्या डिव्हाडरमधयेच चक्क चिलारीची मोठ मोठी चिलारीची झाडे वाढलेली आहेत ती झाडे रस्त्यावर आली आहेत यामुळे याठिकाणी दररोज अपघात होत आहेत.पण याकडे कोणाचेच लक्ष नाही.
मग यामधील चिलारीची वाढलेली झाडे कोण काढणार. हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.खरेतर ग्रामपंचायतीने गावातील हे पश्र सोडावयाचे असतात पण याठिकाणी सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट आहे .यामुळे याकडे कोणच लक्ष देईना अशी परिस्थीती आहे.पण सातारा _ पंढरपूर महामार्गावर पिलीव बसस्थानकापासुन हाकेच्या अंतरावर पूर्वेला डिव्हाडरमधये वाढलेल्या चिलारीची झाडे अपघाताला आमंत्रण देत आहेत .याला निश्चित जबाबदार कोण असा प्रश्न या महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत.
पिलीव येथील महालक्ष्मी देवीची याञा फेब्रुवारीत असते किमान त्यापूर्वी तरी बसस्थानकावरील अपुर्ण कामे पूर्ण व्हावीत अशी पिलीवकरांना अपेक्षा आहे. फोटो _ पिलीव येथील बसस्थानकापासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डिव्हाडरमधये वाढलेली चिलारीची झाडे.


























