तभा फ्लॅश न्यूज/ टेंभुर्णी : राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे कृष्ण जन्माष्टमी निमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी वेदांत राहुल वरगणे व अनुश्री दुनगहु या बालगोपाळांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांचे मन जिंकले.
बालगोपाळांच्या या सुंदर सादरीकरणामुळे वातावरणात भक्तीभावाची एक अनोखी लहर पसरली होती. शाळेतील शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.