सोलापूर – नुकताच देहली येथील बाँबस्फोट झाला. या बॉंब स्फोटकांनी आतंकवादाची नवीन विस्तारलेली आव्हाने लक्षात आणून दिलेली आहेत. आता केवळ सैनिकच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. असे प्रयत्न म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा तो डाव होता. याच समवेत बांगलादेशी घुसखोर, मोठ्या प्रमाणात युवतींचे गायब होणे, युवकांकडून अंमली पदार्थांचा वाढलेला वापर यांसह अनेक समस्या आपल्यासमोर आहे.
भारतात घडणार्या विविध घटनांची अयोग्य माहिती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केली जात आहे. त्यामुळे देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी ‘माहिती योद्धे’ बनण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केले. ते सुशील रसिक सभागृह येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने बोलत होते. या सोहळ्यासाठी ४०० हून अधिक वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थित होती. वेदमंत्रपठण शैलेंद्र जोशी आणि सचिन सवई यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाड्ये आणि हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे आणि सनातन प्रभात चे प्रतिनिधी अजय केळकर हे उपस्थित होते .
_ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त) म्हणाले_
१. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात राबवलेल्या मतदारसूची पुनरावलोकन मोहिमेत ६० लाखापेक्षा अधिक बांगलादेशी घुसखोर सापडले. याचप्रकारे देशात आता सर्वत्र होत असलेल्या या मोहिमेत नागरिकांनी बांगलादेशी घुसखोर शोधून देण्यास सहकार्य करावे. नागरिकांनी सतत सतर्क राहून आपल्या आजूबाजूला कोण रहात आहे याची माहिती घेऊन कुणी संशयित वाटल्यास त्वरित पोलिसांना त्याची माहिती द्यावी.
२. सध्या आपण ‘व्हॉटस अॅप’, तसेच अन्य प्रसारमाध्यमे वापरतो. ही माध्यमे अमेरिकेतून संचलित केली जातात. एखादी गुन्हेगारी घटना घडल्यास ही माध्यमे आपल्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी ‘अरट्टाई’, ‘झोहो’सारख्या स्वदेशी माध्यमांचा उपयोग करायला हवा.
३. सध्या ६० पेक्षा अधिक देशांमध्ये गृहयुद्ध किंवा युद्धसदृष्य स्थिती आहे. त्यातुलनेत भारतात पुष्कळ चांगली स्थिती आहे. सध्या देशाची अवस्था ४ थ्या क्रमांकावर आहे. आपण युरोपला मोठ्या प्रमाणात शस्रास्रे निर्यात करत आहोत.
४. ब्रिगेडीयर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ‘ऑपरेशन सिंधूर’विषयी नेमकी माहिती सांगून त्याविषयी उपस्थितांना अवगत केले.

















