छ. संभाजीनगर – छ . संभाजीनगर येथील नागरिकांसाठी नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य इगतपुरी शहर आता केवळ पर्यटनाचे केंद्र राहिले नसून, ते वास्तव्यासाठीही एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमधील नागरिक आता इगतपुरीमध्ये हक्काचे घर घेण्यास मोठी पसंती देत आहेत. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे या दोन्ही शहरांमधील अंतर अवघ्या काही तासांवर आल्याने, इगतपुरीच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे.
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरहून इगतपुरीला पोहोचणे आता अत्यंत सुलभ झाले आहे. यामुळे ‘वीकेंड होम’ किंवा ‘सेकंड होम’ शोधणाऱ्यांसाठी इगतपुरी हे पहिले केंद्र बनले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे हिल स्टेशन वर्षभर आल्हाददायक हवामान आणि धुक्यांच्या चादरीसाठी ओळखले जाते. मुंबई आणि ठाण्याप्रमाणेच आता संभाजीनगरच्या नागरिकांनाही येथील निसर्गसौंदर्य आणि परवडणाऱ्या घरांच्या किमती भुरळ घालत आहेत.
इगतपुरीतील घोटी परिसरात त्र्यंबकेश्वरच्या सानिध्यात ‘होलिस्टिक लिव्हिंग’ची संकल्पना रूजत आहे. रुंगटा ग्रुप आणि युनायटेड बिल्डर्स यांचा संयुक्त प्रकल्प ‘अर्थ वन’ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जागतिक ख्यातीचे हेल्थ गुरू डॉ. मिकी मेहता हे या प्रकल्पाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याभिमुख जीवनशैली मिळणार आहे. एकूणच, निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळांची जवळीक आणि आधुनिक सोयीसुविधा यामुळे इगतपुरी आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे.
या बाबत डॉ. मिकी मेहता म्हणाले की, “इगतपुरीची नैसर्गिक ऊर्जा विलक्षण आहे. इथली शुद्ध हवा, मोकळे आकाश आणि निसर्गाशी असलेले जवळचे नाते माणसाला शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पुनरुज्जीवित करते. ‘अर्थ वन’ प्रकल्प केवळ घरांची निर्मिती नसून, तो निसर्ग आणि आधुनिक जीवनशैलीचा मेळ घालणारा एक ‘वेलनेस हब’ आहे. जिथे तुम्ही राहता, त्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर होतो आणि इगतपुरी हे आरोग्यदायी जीवनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.”
याबाबत युनाइटेड ग्रुप चे” ललित रुंगटा यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजीनगर आणि जालना पट्ट्यातील नागरिक निसर्गाच्या सानिध्यात घर शोधत आहेत. इगतपुरीतील हा प्रकल्प आम्ही त्यांच्या गरजा लक्षात घेऊनच साकारला आहे. येथे केवळ जमीन किंवा घर न मिळता, एक संपूर्ण ‘कम्युनिटी लिव्हिंग’चा अनुभव मिळणार आहे. समृद्धी महामार्गामुळे इगतपुरीची कनेक्टिव्हिटी ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.”



























