पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड 65 फाटा लेंगरेवस्ती याठिकाणी डाॅ. शंकर भाळे यांचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे.याठिकाणी त्यांची चार मोठी शेड आहेत त्या ठिकाणी ते मोठा व्यवसाय करतात.माञ योग्य उपाययोजना न केल्यामुळे या भागात घरमाशयांचे प्रमाण प्रचंड आहे.आसपासच्या भागातील घरात अक्षरश फरशीवर माश्यांचा थर पाहावयास मिळत आहे.यामुळे घरातील अन्न, पाणी व इतर पदार्थ दुषीत होऊन रोगराई पसरत आहे.
लहान मुले,वयस्कर माणसे ,व इतर सर्व माणसांना सतत आजारपणाचा ञास होत .या माश्यांच्या प्रादुर्भावाने या भागातील नागरिक, जनावरांना जगणे मुश्किल झाले आहे.तसेच या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये सतत कोंबडयांची मर चालु असते.या मेलेल्या कोंबड्या हे महाशय फेकुन देतात. त्या कुञी खातात तसेच त्या कुजून जाऊन त्याठिकाणी त्यातुन दुर्गंधी सुटते .यामुळे या भागातील पाणी दुषीत होते.तसेच कुञी ,तरस, लांडगे प्राण्यांचा वावर वाढला आहे.
याचा शाळेत जाणारी मुले व इतर सर्वच नागरिकांना ञास होत आहे.याबाबत त्या भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन मालकांना उपाययोजना करून नागरिकांना होणारा ञास कमी करावा याबाबत विनंती केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजन न केल्यामुळे नागरिक अक्षरश वैतागले असुन याबाबत त्यांनी ग्रामपंचायत कुसमोड तसेच पिलीव औट पोस्ट याठिकाणी लेखी तक्रार केली आहे.
यावर सरपंच शहाजी लेंगरे,सूर्यकांत वाघमोडे,गणेश लेंगरे,सिद्धेश्वर लेंगरे,संजय पाटील, पिनू साठे,नागेश लेंगरे,नाथा मदने,सुग्रीव लेंगरे,शिवाजी लेंगरे,लक्ष्मण वाघमोडे,विठ्ठल मदने यांच्यासह त्या परिसरातील अनेक नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहेत. सदरचे निवेदन हवालदार पंडित मिसाळ यांनी स्वीकारले.
याबाबत कुसमोडचे सरपंच शहाजी लेंगरे यांना विचारले असता याबाबत सदरच्या कुक्कुटपालन व्यावसायिकला वारंवार समज देऊन आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली पण त्यांनी याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. या भागातील नागरिकांना प्रचंड ञास सहन करावा लागत आहे .यामुळे आम्हास रितसर तक्रार करावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो._ कुसमोड येथील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्याने फेकुन दिलेल्या कोंबड्या तर दुसऱ्या फोटोत गोळा झालेली कुञी


















