पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पुणे येथील युनिव्हर्सल अँनिमल सोसायटी (Universal Animal Walfare Society, Pune ) यांच्या सहकार्याने पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी मोकाट श्वानांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले की, आहे. पंढरपूर शहरातील मोकाट श्वानांना लसीकरण करण्याच्या मोहीम अंतर्गत मंगळवारी (दि.२३) शहरातील प्रभाग क्र ७ मध्ये असलेल्या मोकाट श्वानांना “अँन्टी रेबीज लसीकरण तसेच नसबंदी” करण्याचे हेतून पकडण्यात आले आहे.
दरम्यान पकडण्यात आलेल्या मोकाट श्वानांना ज्या ठिकाणाहून पकडलेले आहे त्याच ठिकाणी पुन्हा लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की, आपल्या परिसरातील मोकाट श्वानांपासून भविष्यात लहान मुले ,वयोवृद्ध व्यक्तींना तसेच महिलांना भविष्यात चावा घेतल्यास त्याच्या पासून कोणती गंभीर स्वरूपाची शारीरिक इज्जा होऊ नये यासाठी सदरील प्रक्रिया करणे गरजेचे आहे तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे देखील आवाहन मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.
————————–
श्वानांचा त्रास अभंगराव यांच्या करावा संपर्क
शहर आणि उपनगरातील आपल्या परिसरात मोकाट श्वानांचा त्रास असल्यास पंढरपूर नगरपरिषदेचे श्री.अभंगराव (संपर्क क्र. ७७७४०७००२१) यांच्याशी संपर्क करावा असे देखील आवाहन मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.

























