सोलापूर – सुरवरम प्रताप रेड्डी तेलुगु विश्वविद्यालय मंडली व्यंकटी कृष्णाराव हैदराबाद २०२५ उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम मार्फत मार्कंडेय उद्यानात पहाट गाण्याचे आयोजन करण्यात आले.
ग्रंथालयाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते तेलुगु तल्ली प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले.ऑर्केस्ट्रा स्टार्स ऑफ मेलोडीज जब्बार मुर्शद प्रस्तुत कु. भव्या तुमुलूरू, हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक गायक गोवर्धन कमटम ,बालाजी द्यावरकोंडा, बालाजी कारमपुरी, अनुराधा गंगूल, अखिला आरकाल व वादक धनंजय अंबेकर यांनी दिवाळीनिमित्त पहाट गीत सादर केले.

प्रथम तुला वंदितो, कानडा विठ्ठला, शंकराभरणम, अन्नमया,घना घना सुंदरा,प्रभाते कर दर्शनम ,अदीगो अलरीगो,नमो सिद्धरामय्या,दिपावली मनाई सुहानी,सुख के साथी,कृष्ण कन्हैया व भैरवी राग इत्यादी तेलुगू , मराठी, कन्नड , हिंदी,तामिळ गीतांनी परिसर भक्तीमय झाले . अंबादास कनकट्टी मिमिक्री सादर रसिकांची मने जिंकली.मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे कु.भव्या तुमुलूरू, जब्बार मुर्शद, गोवर्धन कमटम, बालाजी द्यावरकोंडा, बालाजी कारमपुरी, अनुराधा गंगूल व अखिला आरकाल व वादक धनंजय अंबेकर यांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम,कार्याध्यक्ष बालराज बोल्ली, सचिव तिप्पणा गणेरी ,उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदूल ,खजिनदार श्रीनिवास गाली, सदस्य पेंटप्पा गड्डम, कवी प्रा.नरेंद्र गुंडेली, सौ. राजलक्ष्मी गाडपल्ली, ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे सांस्कृतिक प्रमुख कवियत्री रेणुका बुधाराम यांनी केले तर सहसचिव प्रभाकर भिमनाथ यांनी आभार मानले .या कार्यक्रमास पूर्व भागातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

















