कंधार (प्रतीनिधी )तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी तांडा शाळेच्या सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे (जुंबाड ) यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून , सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून अनिता तुकाराम दाणे ह्या शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र झाल्या आहेत.
अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर जळगाव. 2024 येथे अनिता दाणे यांच्या कवितेची निवड झाली होती. या गेल्या चोवीस वर्षापासून विविध वृत्तपत्रात, मासिकात लेख, कविता,कथा.. संपादकीय अशा विभिन्न साहित्य प्रकारात लेखन केले आहे. स्वयंसिद्धा हा कवितासंग्रह व उत्तुंग या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रासाठक अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून एकल महिला व त्यांच्या मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहेत.
राज्य महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर बालभारतीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच राज्य प्रदुषण नियंत्रण( वृक्षारोपण व संवर्धन)मंडळावर सदस्य म्हणून काम करतात. त्याच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अनिताताई दाणे-जुंबाड यांचे अभिनंदन केले आहे.