सोलापूर – दहावी व बारावी परीक्षादरम्यान विद्यार्थी व शिक्षकांची असुविधांमुळे गैरसोय होत असते. तसेच सुरक्षाअभावी काॅफीपुरवठाही होते. म्हणून अशा परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या अहवालाचे अभ्यास करून जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी परीक्षा बंद करायचे की सुरू ठेवायचे , याबाबत भवितव्य ठरविणार आहेत.
जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी प्रत्येक केंद्राला भेटी देणार आहेत . त्यांचा अहवाल आल्यावरच केंद्र ठेवायचे की रद्द करायचे हे ठरवले जाणार आहे. परीक्षा केंद्रात सीसीटीव्हीसह इतर भौतिक सुविधा व सुरक्षा सुविधा उपलब्ध असल्याचे तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र टिकविण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे अहवाल महत्वाचे आहे.
दहावी-बारावी परीक्षे संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्यासह अन्य अधिकारी व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी आढावा घेतला .
दहावी-बारावी परीक्षा होत असलेल्या प्रत्येक केंद्रातील भौतिक सुविधांबाबत आवश्यक माहिती वेबसाइटवर भरणे बंधनकारक आहे. भौतिक सुविधांबाबतची माहिती भरल्यानंतर त्या सुविधा उपलब्ध आहेत की नाही ? याबाबत शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावरील वर्गखोल्यांच्या खिडक्यांना जाळी मारणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही, पाणी, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत यांसह अन्य विविध भौतिक सुविधा नसल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
दहावी-बारावी परीक्षेपूर्वी तयारीचा आढावा व केंद्राची तपासणी करण्यासाठी पुणे बोर्डाचे पथक सोलापुरात येणार आहे. गटशिक्षणा अधिकारी व त्यांच्या पथकाकडून आलेले अहवाल शिक्षणाधिकारी बोर्डाला देणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
केंद्रसंचालक म्हणून विद्यमान प्राचार्य काम पाहणार आहेत.
..
….,
परीक्षा सुरळीत फार पाडण्याचा प्रयत्न
.,.
पुणे बोर्डाच्या वतीने दहावी- बारावी परीक्षेसंदर्भात आढावा व तयारीच्या अनुषंगाने सूचना करण्यात आले आहेत. केंद्रावर कोण कोणत्या सुविधा असाव्यात ? काय काय काळजी घ्यावी ? यासह अन्य विविध विषयावर चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून परीक्षा सुरळीत होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू.
सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद , सोलापूर















