सोलापूर – सर्वात मोठा दीपावलीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्यामुळे हा सण साजरा करण्यासाठी राज्य शासनाने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी ऑक्टोंबर २०२५ या महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने राज्य शासनाकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी सोलापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अजयकुमार जाधव यांच्यामार्फत दिले आहे. यावेळी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, चेअरमन जयश्री माने देशमुख, विजयकुमार कोळी, हनुमंत कारमकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जाधव यांनी हे निवेदन राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल. त्यांच्याकडून आदेश येतात याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.