नवीन नांदेड – नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे , क्रीडा क्षेत्रात नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा , तरुणांचे आरोग्य उत्तम राहावे ,यासाठी आसर्जन येथे २५ एकरवर इन डोअर स्टेडियम उभारण्यात यावे अशी मागणी आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे
ना. माणिकराव कोकाटे दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आले आसता यावेळी आ. बोंढारकर यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या मालकीची स्टेडियम परिसरात जागा शिल्लक नसल्यामुळे अद्यावत क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता महापालिकेची जागा अपुरी आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाकरिता माझ्या मतदारसंघा मधिल मौ. असर्जन (कौठा) ता.जि. नांदेड येथील २५ एकर जागा जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या नावे करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करणेबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी मा. विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) यांचे कार्यालयामार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्यास अनुसरुन शासनाकडून जागा प्राप्त करून घेण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सद्यस्थीतीत जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रकारचे अद्यावत राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करता आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुला करीता नव्याने मौ. आसर्जन (कौठा) ता.जि.नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांचे ताब्यात असलेली गट क्रं. १११,११२, ११३, व ११४, ११५ संदर्भात फेर मोजणी करुन २५ एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या कडून मा. विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर यांच्या मार्फत मा.अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आला आला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच लवकरात लवकर मंत्रालयात यासाठी क्रीडामंत्री कोकाटे यांनी बैठक बोलवण्याचीही सांगितले आहे..























