मंठा : पुर्णा नदीकाढच्या सासखेडा व टाकळखोपा येथील वाळू डेपो नंतर तळणीच्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ युवा उद्योजक शरद पाटील , तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते यांच्या हस्ते रोजी करण्यात आला. या वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना सहज वाळू मिळणार आहे .
मंठा तालुक्यातील पुर्णा नदीकाढच्या सासखेडा , टाकळखोपा व तळणी येथील वाळू विक्री डेपो सुरु झालेत . याप्रसंगी राजाभाऊ तांबे , नानासाहेब खंदारे , बाळासाहेब गायकवाड , गजानन कांगणे , प्रदिप चाटे , कृष्णा खंदारे , कृष्णा वाघमोडे , महादेव माने , प्रभाकर मोरे , किशोर खंदारे , कैलास सोनूने , अमित तांबे , नानासाहेब तांबे, बन्टी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .
वाळू विक्री डेपोमूळे सहज वाळू मिळेल – तांबे
सासखेडा , टाकळखोपा व तळणी येथील वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात व सहज वाळू उपलब्ध होणार आहे. वाळू डेपोमुळे ट्रान्सपोर्ट व बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. या क्षेत्रातील बहुतांशी लोकांना हातात कामे उपलब्ध होणार असल्याचे राजाभाऊ तांबे यांनी सांगितले.
वाळू उत्खनानासाठी मजुर मिळेना !
पुर्णा काढच्या तीनही वाळू डेपो सुरू झालेत. मात्र , ठरावीक लोकांना वाळू मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. नदीपात्रातुन डेपो पर्यंत वाळू उत्खनानासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे . त्यामुळे वाळू साठा होत नसुन बुकिंग करण्यासाठी अडचणी येत आहेत. डेपोधारक व प्रशासनाने यावर तोडगा काढुन आँनलाईन किंवा ऑफलाइन नोंदणी करून सहज वाळू उपलब्ध करून द्यावी . अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड यांनी केली.