रेल्वे विभागाने प्रवाशांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान स्मार्टफोन किंवा तत्सम कोणतीही गोष्ट गहाळ झाल्यावर टेन्शन घेण्याची गरज आता संपली आहे.
भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागाकडून नुकतच एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाची माहिती मिळणार आहे. ‘ऑपरेशन अमानत’ नावाच्या या उपक्रमाद्वारे हे सामान तुम्हाला परत मिळणार आहे.
हरवलेलं सामान परत मिळवण्यासाठी तुम्हाला https://wr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,2,753 या संकेतस्थळाला भेट द्यावी. यानंतर तुम्हाला तुमच्या नजीकच्या डिव्हीजन ऑफिसला भेट द्यावी लागेल.