सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि पीएम उषा योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे दिनांक 13 आणि 14 मार्च 2026 रोजी Indian Music and Theatre: Tradition, Technology and the World या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना “विद्यार्थ्यांनी संगीत आणि नाट्य क्षेत्रामध्ये प्रयत्नपूर्वक नवनवीन संशोधनावर भर दिला पाहिजे” असे प्रतिपादन डॉ दामा यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ रंगकर्मी आणि संपादक रजनीश जोशी ललित कला आणि कला संकुलाच्या संचालिका डॉ. ज्योती माशाळे हे मान्यवर उपस्थित होते.
सदर परिषदेसाठी ढाका बांगलादेश येथील नाट्य अभ्यासक आणि रंगकर्मी शोवन कुमार दास ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. तसेच एमआयटी पुणे या संस्थेचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमोल देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आंबेजोगाईच्या नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संपदा कुलकर्णी तसेच डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे हे मान्यवर नाट्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आणि डॉ. मनीष कुमार वर्मा दिल्ली विद्यापीठ येथून तर डॉ. अतिंद्र सरवडीकर मुंबई विद्यापीठ, मुंबई येथून संगीत विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण 70 संशोधकांनी सहभाग नोंदवला. तसेच एकूण 45 रिसर्च पेपर या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर करण्यात आले.
अल्पावधीतच नावारूपास आलेल्या सोलापूर विद्यापीठातील नाट्यशास्त्र आणि संगीत विभागाच्या कार्याचे कौतुक बाहेरील विद्यापीठातील सर्वच साधक व्यक्तींनी केले.
ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी ललित कला व कला संकुलाच्या संचालिका डॉ. ज्योती माशाळे, नाट्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अमोल देशमुख तसेच तबला विभागाचे सहाय्यक प्राध्यापक विशाल सोमवंशी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. आणि त्यांना सिद्धार्थ सनमडीकर, धनंजय टाकळीकर , स्वप्निल क्षीरसागर, प्रमोद सुतकर आणि दिनेश शेंडगे यांचे सहकार्य लाभले.























